Biography

डॉ. उमेश मुंडल्ये

 PhD (Botany, Ecology), 2002 मुंबई विद्यापीठ

MSc (Plant Physiology Biochemistry), 1996, मुंबई विद्यापीठ

 Advanced Course in irrigation, Naan Daan Jain, 2013 इस्त्रायल
 1996 - प्राध्यापक म्हणून काम सुरू
 1997-2000 - Bombay Natural History Society येथे विविध प्रकल्पांवर संशोधक म्हणून काम
 2000 पासून - पाणी, पर्यावरण आणि शेती या क्षेत्रांमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत

 2002 - Indigenous knowledge-based conservation of sacred groves of Maharashtra, या विषयावरील संशोधनाबद्दल मुंबई विद्यापीठाकडून झहऊ प्रदान

 पश्चिम घाटातील देवरायांचे लोकसहभागातून संरक्षण आणि संवर्धन यासाठी गेली 22 वर्षं विविध संस्थांबरोबर काम सुरु
 आजपर्यंत 3768 देवरायांची नोंद, 1500 पेक्षा जास्त देवरायांना प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास
 महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये जलसंधारण आणि व्यवस्थापन यासाठी 200 पेक्षा जास्त गावांमध्ये जलसंधारण प्रकल्प लोकसहभागातून काम पूर्ण
 250 पेक्षा जास्त आस्थापनांमध्ये (गृहनिर्माण प्रकल्प, शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, क्रीडांगणं, इत्यादि) पर्जन्य जलसंधारणाचे प्रकल्प पूर्ण
 पाणी आणि पर्यावरण या विषयांवर अनेक नियतकालिकांमध्ये नियमित स्तंभलेखन, लेख, इत्यादीमधून जाणीवजागृती

देवराई, पाणी या विषयावर लोकांमध्ये जाणीव जागृतीसाठी 200 पेक्षा जास्त व्याख्यानं
देवराई वर बनवलेल्या 3 माहितीपटांसाठी तज्ज्ञ म्हणून काम. पुणे विद्यापीठासाठी केलेल्या माहितीपटाला 2018-19 सालातील आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून सन्मान