Look Inside
Sale!

कर्तव्यभूमीचे पुजारी ( पाच पुस्तकांचा संच )

कर्तव्यभूमीचे पुजारी ( पाच पुस्तकांचा संच )
फक्त २५०/- रुपयांत 
* मा. रवींद्र पवार, कोकण प्रांत – अभाविपचे कार्यकर्ता ते कोकण प्रांत सहकार्यवाह अशा चढत्या भाजणीमध्ये जबाबदारी घेऊन संघकामाचा सामाजिक आशय प्रकट करणारे कार्यकर्ते म्हणजे रवींद्र तुकाराम पवार होय.
* मा. मोहनराव गवंडी, प. महाराष्ट्र प्रांत – भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. विधान परिषदेचे आमदार. सामाजिक समरसता मंचाचे संस्थापक म्हणून मोहनराव गवंडी यांनी दीर्घकाळ काम केले आहे.
* गोविंदराव (नाना) आहेर, प. महाराष्ट्र प्रांत – नाशिक जिल्ह्यातील ग्रमीण भागात संघकामाची व्याप्ती वाढवून स्वयंसेवकांना कायम आपुलकी, प्रेमाची अनुभूती देणारे जिल्हा संघचालक म्हणून गोविंदराव (नाना) आहेर यांनी काम केले.
* भाऊसाहेब जहागीरदार, देवगिरी प्रांत – ज्येष्ठ संघकार्यकर्ते. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हिंदुत्त्वाचा विषय सर्वदूर घेऊन जाणारे कार्यकर्ते म्हणजे भाऊसाहेब जहागीरदार होय.
* बापूसाहेब लाखणीकर, विदर्भ प्रांत – विदर्भातील पहिल्या पिढीचे संघ स्वयंसेवक. शिक्षण क्षेत्रात संस्थात्मक बांधणी करुन राष्ट्रीय विचारांची जपवणूक करणारे कार्यकर्ते म्हणजे बापूसाहेब लाखणीकर होय.

250.00

Share this product!

संघ संस्थापक पू. डॉक्टर हेडगेवारांनी बीजारोपण केलेला संघवृक्ष आता सर्वार्थाने बहरला असून त्याच्या शीतल छायेत आपल्या सर्वांची वाटचाल सुरू आहे. संघ वाटचालीत अनेक आघात आणि संकटांचा सामना करत करत अग्नीपरीक्षा देत 2025 ला संघ आपल्या शताब्दी वर्षात पदार्पण करीत आहे. या अग्नीपरीक्षेत अनेक संघस्वयंसेवकांचा कस लागला. असहकार, अपुरी साधन सामग्री, संपर्क साधनांचा अभाव या सर्वांवर मात करीत असंख्य संघस्वयंसेवकांनी आपल्या जीवनव्यवहारातून संघविचार प्रकट केला. संघमंत्र जगला.

आज जगातील सर्वात मोठी अ-राजकीय संघटना म्हणून संघ ओळखला जातो. 2025 हे संघशताब्दीचे वर्ष असणार आहे. आज समाजात आरोग्य, सेवा, संस्कार, संस्कृती, शिक्षण, स्वावलंबन, धर्मरक्षण, अर्थकारण सहकार, संघटन अशा विविध क्षेत्रांत दीर्घकाळ काम करणारे अगणित स्वयंसेवक संघशाखेत घडले आणि त्यांनी शाखेत मिळालेल्या संस्कारांचे आपआपल्या क्षेत्रात बीजारोपण केले.

भारतमातेच्या परमवैभवाचे स्वप्न साकार करण्यासाठी कर्तव्यभूमीच्या या पुजार्‍यांनी आपल्या समिधा राष्ट्रकार्याच्या यज्ञात समर्पित केल्या. संघ शताब्दीकडे वाटचाल करताना अशा कर्तव्यभूमीच्या पुजार्‍यांचे स्मरण करून त्यांच्या कार्याला वंदन करताना हा कर्तृत्वाचा वारसा पुढील पिढीला समजावून सांगितला पाहिजे.
म्हणूनच सा. विवेकने 2025 पर्यंत दर चार महिन्यांनी पाच कर्तव्यभूमीच्या पुजार्‍यांच्या कार्याचा संच प्रकाशित करण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रात वेगवेगळ्या स्वरूपात संघ काम करणार्‍या दिवंगत संघ स्वयंसेवकाच्या कामाचा परिचय करून देणार्‍या पुस्तिका प्रकाशित होणार आहेत.

दुसर्‍या माळेतील मोती
* मा. रवींद्र पवार, कोकण प्रांत – अभाविपचे कार्यकर्ता ते कोकण प्रांत सहकार्यवाह अशा चढत्या भाजणीमध्ये जबाबदारी घेऊन संघकामाचा सामाजिक आशय प्रकट करणारे कार्यकर्ते म्हणजे रवींद्र तुकाराम पवार होय.
* मा. मोहनराव गवंडी, प. महाराष्ट्र प्रांत – भारतीय मजदूर संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते. विधान परिषदेचे आमदार. सामाजिक समरसता मंचाचे संस्थापक म्हणून मोहनराव गवंडी यांनी दीर्घकाळ काम केले आहे.
* गोविंदराव (नाना) आहेर, प. महाराष्ट्र प्रांत – नाशिक जिल्ह्यातील ग्रमीण भागात संघकामाची व्याप्ती वाढवून स्वयंसेवकांना कायम आपुलकी, प्रेमाची अनुभूती देणारे जिल्हा संघचालक म्हणून गोविंदराव (नाना) आहेर यांनी काम केले.
* भाऊसाहेब जहागीरदार, देवगिरी प्रांत – ज्येष्ठ संघकार्यकर्ते. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हिंदुत्त्वाचा विषय सर्वदूर घेऊन जाणारे कार्यकर्ते म्हणजे भाऊसाहेब जहागीरदार होय.
* बापूसाहेब लाखणीकर, विदर्भ प्रांत – विदर्भातील पहिल्या पिढीचे संघ स्वयंसेवक. शिक्षण क्षेत्रात संस्थात्मक बांधणी करुन राष्ट्रीय विचारांची जपवणूक करणारे कार्यकर्ते म्हणजे बापूसाहेब लाखणीकर होय.

Binding

hard binding

भाषा

मराठी

पृष्ठसंख्या

240

वर्ष

2022

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “कर्तव्यभूमीचे पुजारी ( पाच पुस्तकांचा संच )”

Your email address will not be published. Required fields are marked *