Biography

जोसेफ तुस्कानो

शिक्षण : एम.एस्सी. (मुंबई विश्वविद्यालय)
डिप्लोमा इन पेट्रोलियम टेक्नॉलॉजी (ब्रिटिश इन्स्टिटयूट)
लेखन :
* विज्ञान, पर्यावरण, जैवतंत्रज्ञान, पेट्रोलियम, शरीर शिक्षण तसेच विविध ललित विषयावर मराठी-इंग्रजी प्रौढांसाठी आणि मुलांसाठी 25 पुस्तके.
* महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, सकाळ, नवशक्ती, प्रहार, दिव्यमराठी या दैनिकातून नियमित लेखन.
* आकाशवाणीवरून पर्यावरण व पेट्रोलियम या विषयांवर भाषणे देण्यासाठी आमंत्रण.
* सामाजिक संस्था आणि शाळा, महाविद्यालयांतून शंभराच्या वर व्याख्याने.
ठळक पुरस्कार : प्रा. मो.वा. चिपळूणकर पुरस्कार, भारत पेट्रोलियमचा जनस्फुर्ती पुरस्कार, पीपल्स आर्ट सेंटर, मुंबईचा वसई-विरार जीवन गौरव पुरस्कार, मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचा साहित्य भूषण पुरस्कार, मराठी संपादक परिषदेचा आदर्श पत्रकारिता पुरस्कार.