भारतात रस्ते अपघातांमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होताना आपण पाहिले आहेत. त्यामुळे वाहनचालक, विद्यार्थी आणि नागरिक यांच्या मार्गदर्शनासाठी विवेक पुस्तक प्रकाशनच्या माध्यमातून
‘सुरक्षित रस्ते वाहतूक : चालक प्रशिक्षण, नागरी कर्तव्ये आणि शिस्त’
या विषयाचे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे.
पुस्तकाचे लेखक महेश नाईक हे स्वत: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात वरिष्ठ पदावर 35 वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेले अधिकारी आहेत. या पुस्तकातून त्यांनी चालक प्रशिक्षण, रस्ते वापरताना नागरिकांची कर्तव्ये, रस्ते वाहतूक शिस्त, कायदे, नियम, वाहन तंत्रज्ञान व सुरक्षितता अशी विविध विषयांवर अगदी साध्या आणि सोप्या मराठी भाषेत माहिती दिलेली आहे.
मूळ किंमत 350/- रु.
सवलत मूल्य 310/- रु.


