आध्यात्मिक
राम मंदिर ते राष्ट्र मंदिर
राम मंदिरातून उभे राहणारे आपले राष्ट्र मंदिर म्हणजे ‘रामराज्य’ उभे करण्याचा आपला संकल्प कसा असेल, हे या पुस्तकातून उलगडणार आहे.
हेच पुस्तक का वाचावे?
कारण यात पाच शतकांच्या संघर्षाच्या इतिहासापासून आत्मनिर्भर भारत कसा उदयाला येईल याविषयीच्या विविध लेखांचा समावेश आहे. विवेकानंदांच्या संकल्पनेतील भारतपासून आत्मनिर्भर भारताचा मोदी मार्ग दाखविण्यात आला आहे. तर आपल्या प्रत्येकाच्या स्वप्नातील भारत कसा असेल, शास्त्रसज्ज भारत कसा असेल, नव्या जगाचे शिक्षण, नव्या युगाचे राजकारण, समाजहिताचे तंत्रज्ञान, भविष्यातील भारतीय समाज कसा असेल याचे अभ्यासपूर्ण विवेचन तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
संपादक : रवींद्र गोळे
पुण्यभूमी भारत
आपली संस्कृती, आपली तीर्थस्थान, आपले संत – संप्रदाय, आपल्या नद्या – पर्वत यात विविधता असली तरी सांस्कृतिकदृष्ट्या भारत म्हणून आपण एक आहोत, याचे दर्शन घडविणारे पुस्तक…
फक्त १८०/- रुपयांत…
भेटवा विठ्ठला
१ मे १९४७ रोजी साने गुरुजींनी हरिजनांच्या विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी पंढरपूरमध्ये प्राणांतिक उपोषण सुरू केले व दि. १० मे रोजी त्यांचा लढा यशस्वी होऊन उपोषणाचीही यशस्वी सांगता झाली. महात्मा गांधी, शंकराचार्य, लोकसभेचे सभापती दादासाहेब मावळणकर, सेनापती बापट, समस्त बडवे कमेटी आणि सनातनी ब्रह्मवृंद यांच्या परस्पर भिन्न भिन्न भूमिकांनी हा लढा प्रचंड गाजला.
या सत्याग्रहाच्या ऐतिहासिक घटनेवर ज्येष्ठ पत्रकार विद्याधर ताठे लिखित सा. विवेक प्रकाशित भेटवा विठ्ठला पुस्तक
सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रिया किती गुंतागुंतीच्या आणि अनेक पदरी असतात हे नव्या पिढीने समजून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
किंमत – २००/- रु.
सवलत मूल्य – १८०/- रु.
विठ्ठलनामाचा रे टाहो…
विठ्ठलनामाचा रे टाहो…
लेखिका : विनीता तेलंग
पुस्तकाचे वैशिष्ट्य : यातील प्रत्येक ओवी, अभंग आपल्याला ऐकता येणार आहे.
हे पुस्तक नक्कीच वाचकांना भावसमृद्ध करेल, याची खात्री आहे.
मूळ किंमत : 120/- ₹