दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी
2024ची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून पद्मश्री रमेश पतंगे लिखित ‘दि गेम चेंजर : नरेंद्र मोदी’
भारतात झालेले परिवर्तन समजून घेण्यासाठी, कोणता खेळ मोदींनी बदलला, हे समजून घेण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना विषय मांडणीसाठी हे पुस्तक उपयुक्त आहे.
पुस्तकाचे नाव : दक्षिण पर्व
शिवराज्याभिषेकास 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने…
स्नेहलता स्वामी यांच्या लेखणीतून साकारलेली कादंबरी
राज्याभिषेकानंतर एक सार्वभौम राजा म्हणून काढलेली आणि एकंदरीत राजांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी मोहीम म्हणजे दक्षिण मोहीम.
राजांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख पटते ते याच कालावधीत. त्यांच्या विचारांची उंची आणि खोली अनुभवण्याची सुंदर पर्वणी येथे मिळते. त्यांची कुशलता, सावधानता, चपळता, दूरदृष्टी, रणनीती, कर्तव्यकठोरता आदींचा परिचय याच काळात जवळून होतो.
राजा म्हणून अभिमानाने नतमस्तक व्हावे, असा हा कालखंड दक्षिण पर्व या कादंबरीत मांडण्यात आला आहे.
प्रत्येक मराठी माणसाने वाचावी अशी ही कादंबरी.
पुस्तकाचे नाव : दक्षिण पर्व
लेखिका : स्नेहलता स्वामी
पृष्ठसंख्या : 188
किंमत : 275/- रु.
भारतमातेच्या वीरांगना
या 75 विरांगनांमध्ये केवळ स्वातंत्र्यसमराच्या काळातील महिला नसून त्याही आधीपासून इंग्रजांशी लढा देत असलेल्या महिला वीरांगना आहेत. यात पहिला मानवी बाँब आणि पहिली सशस्त्र महिला तुकडी बनविणार्या राणी वेलू नाचियार, राणी चेन्नमा, राणी शिरोमणी, देवी अहिल्याबाई होळकर अशा वीरांगनांचा समावेश आहे. तसेच मूलमती, अम्मी स्वामीनाथन, उदा देवी, अवंतीबाई गोखले, राजकुमारी गुप्ता, बेगम हजरत महल, मीरा बहन, पेरिबेन कॅप्टन, फुलो-झानो मुर्मू, अजीजन बाई अशा अपरिचित वीरांगनांचीही माहिती देण्यात आली आहे.
स्वातंत्र्याची 75री साजरी करीत असताना अशा वीरांगनांचे स्मरण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
२५०/-
महाराष्ट्राचे कृषिनायक
ही गाथा आहे महाराष्ट्रातील ३०हून अधिक जिल्ह्यातील प्रयोगशील शेतकऱ्यांची.. विविध कृषी घटकांत अभूतपूर्व कृषी -क्रांती घडवून आणणार्यांची…
शेती व्यवसाय करणाऱ्या सर्वांनाच हा ग्रंथ निश्चितच प्रेरणादायी ठरेल…
किमत 1000 रु /-
योजक संघमहर्षी : मोरोपंत पिंगळे
रामजन्म भूमी मुक्ती आंदोलनाचे सूत्रधार, हिंदू भाव जागरणाचे शिल्पकार,अनेक सामाजिक संस्थाचे संस्थापक मा. मोरोपंत पिंगळे यांचा जीवन कार्याचा वेध घेणारा चरित्र ग्रंथ…
योजक संघमहर्षी : मोरोपंत पिंगळे
सवलत मूल्य – ३५०/- रु.
रसमयी लता
विनिता तेलंग लिखित लतादीदींनी गायिलेल्या नवरसांवरील गाण्यांच्या रसास्वादाचे पुस्तक…
साहित्य, संगीत क्षेत्राची आवड असलेल्यांसाठी खास मेजवानी…
पुस्तकाच्या मॅटर सहित लतादीदींचे सुंदर पोट्रेट, लतादीदींच्या विविध भावमुद्रांची रंगीत चित्रं आणि हार्डबाऊंडिंग कव्हर ही या पुस्तकाची खास वैशिष्टये…
पुस्तकाची मूळ किंमत – रु. २५०/-