Biography
डॉ. उमेश मुंडल्ये
PhD (Botany, Ecology), 2002 मुंबई विद्यापीठ
MSc (Plant Physiology Biochemistry), 1996, मुंबई विद्यापीठ
Advanced Course in irrigation, Naan Daan Jain, 2013 इस्त्रायल
1996 - प्राध्यापक म्हणून काम सुरू
1997-2000 - Bombay Natural History Society येथे विविध प्रकल्पांवर संशोधक म्हणून काम
2000 पासून - पाणी, पर्यावरण आणि शेती या क्षेत्रांमध्ये तांत्रिक सल्लागार म्हणून कार्यरत
2002 - Indigenous knowledge-based conservation of sacred groves of Maharashtra, या विषयावरील संशोधनाबद्दल मुंबई विद्यापीठाकडून झहऊ प्रदान
पश्चिम घाटातील देवरायांचे लोकसहभागातून संरक्षण आणि संवर्धन यासाठी गेली 22 वर्षं विविध संस्थांबरोबर काम सुरु
आजपर्यंत 3768 देवरायांची नोंद, 1500 पेक्षा जास्त देवरायांना प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यास
महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये जलसंधारण आणि व्यवस्थापन यासाठी 200 पेक्षा जास्त गावांमध्ये जलसंधारण प्रकल्प लोकसहभागातून काम पूर्ण
250 पेक्षा जास्त आस्थापनांमध्ये (गृहनिर्माण प्रकल्प, शाळा, महाविद्यालये, हॉस्पिटल्स, क्रीडांगणं, इत्यादि) पर्जन्य जलसंधारणाचे प्रकल्प पूर्ण
पाणी आणि पर्यावरण या विषयांवर अनेक नियतकालिकांमध्ये नियमित स्तंभलेखन, लेख, इत्यादीमधून जाणीवजागृती
देवराई, पाणी या विषयावर लोकांमध्ये जाणीव जागृतीसाठी 200 पेक्षा जास्त व्याख्यानं
देवराई वर बनवलेल्या 3 माहितीपटांसाठी तज्ज्ञ म्हणून काम. पुणे विद्यापीठासाठी केलेल्या माहितीपटाला 2018-19 सालातील आशिया खंडातील सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून सन्मान