ज्येष्ठ संघ स्वयंसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि समरसता पुनरुत्थान गुरुकुलाचे संस्थापक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या ‘परिसांचा संग’ या पुस्तकातून लौकिकाला अलौकिक करणार्या ध्यासवेड्यांची व्यक्तिचित्रणे रेखाटली आहेत. या व्यक्तिचित्रणांच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाची दिशा स्पष्ट करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा. साहित्यिक भाषेत संघ कार्यकर्त्याचा परिचय करून देणारे हे पहिलेच पुस्तक असेल.
समरसता, बंधुता, समता या मूल्यांची पाठराखण करणार्या व्यक्तिरेखा प्रभुणे यांनी ज्या आत्मियतेने रेखाटल्या आहेत, ते पहाता मराठी साहित्यात एका नव्या अक्षरलेण्याची निर्मिती झाली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मोरोपंत पिंगळे, दत्तोपंत ठेंगडी, डॉ. काका कुकडे, नितिन गडकरी, विनोद तावडे, कुशाभाऊ पटवर्धन, डॉ. नरेंद्र जाधव, सुभाष अवचट, कवी ग्रेस, डॉ. प्रभाकर मांडे, आसाराम कसबे, राजश्री काळे, लता मंगेशकर, शुभांगी तांबट, डॉ. सुवर्णा रावळ, रावसाहेब कुलकर्णी अशा 43 व्यक्तिचित्रणांचा या पुस्तकातून नव्याने परिचय होईल.
केवळ संघकार्यकर्तेच नव्हे तर संघाबाहेरील व्यक्तिचित्रणेही गिरीश प्रभुणे यांनी रेखाटली आहेत. हे पुस्तक म्हणजे भारतातील कर्तृत्वसंपन्न व्यक्तिमत्त्वांचे, त्यांच्या कार्याचे, आचार-विचारांचे दर्शन घडविणारी तीर्थयात्राच आहे.
पुस्तकाची किंमत ३००/- रुपये असली तरी यातील ५०/- रुपये गिरीश प्रभुणे यांचे जीवनकार्य असणाऱ्या ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ संस्थेला देणगी रूपाने दिले जातील.
Reviews
There are no reviews yet.