लोकनेता ते विश्वनेता : नरेंद्र मोदी (हिंदी)
प्रकाशन : मार्च 2021 * किंमत : 750/- रु. संघ प्रचारक ते मुख्यमंत्री, मुख्यमंत्री ते लोकनेता, लोकनेता ते भारतासारख्या खंडप्राय देशाचा पंतप्रधान अशी थक्क करणारी वाटचाल करणार्या मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकर्तृत्वाच्या प्रवासाची वाटचाल उलगडणारा ग्रंथ.
वन जन गाथा
वन जन गाथा
प्रकाशन : मार्च 2018 * किंमत : 600/- रु.
जनजातींच्या संस्कृती, परंपरा यासोबतच सद्यकालीन समस्या, त्या दूर करण्यासाठी शासन व सामाजिक सेवासंस्था करीत असणार्या कार्याचा आढावा घेणारा ग्रंथ.
समग्र वंदे मातरम्
प्रकाशन : नोव्हें. 2021 * किंमत : 1500/- रु.
राष्ट्राच्या इतिहासामध्ये अनेक व्यक्तींच्या कर्तृत्वाला, कामगिरीला महत्त्वाचे स्थान असते. परंतु एका गीताने किंबहुना त्यातील दोन शब्दांनी देशाच्या इतिहासाला वळण देण्याचे असे उदाहरण वेगळेच. 1875 मध्ये बंकिमचंद्रांच्या अलौकिक प्रतिभेतून हे गीत निर्माण झाले. हे गीत म्हणजेच ‘वंदे मातरम्.’ हिमालयाची उत्तुंगता, गंगेची निर्मलता अशा उपमा ज्या गीताला लागू पडतील असे हे गीत! भारतीय स्वातंत्र्याचा मंत्र ‘समग्र वंदे मातरम्’चा समग्र इतिहास या ग्रंथातून मांडण्यात आलेला आहे. मराठी भाषेत हा ग्रंथ उपलब्ध आहे.
समर्थ भारत : स्वप्न-विचार-कृती
समर्थ भारत : स्वप्न-विचार-कृती
प्रकाशन : मार्च 2017 * किंमत : 750/- रु.
विकसित आणि समर्थशील होणार्या भारताची शब्दचित्रे रेखाटणारा ग्रंथ
हिंदुत्व (हिंदी आणि मराठी)
प्रकाशन : मार्च 2022 * किंमत : 1000/- रु. सांप्रत काळ हा हिंदुत्वाचा आहे त्यामुळे हिंदुत्वाचा आशय समजून घ्यायला हवा. हिंदुत्वाच्या विविध आयामांची आधुनिक परिप्रेक्षात मांडणी करणारा ग्रंथ.