शिदोरी

या पुस्तकातील कथांमधील पात्रांमध्ये तुम्ही स्वत:ला शोधू शकता. पूरक शैक्षणिक साहित्य म्हणून या पुस्तकाचा नक्कीच उपयोग होईल.

80.00

शोध नावीन्याचा

दुर्बीण, प्रेशर कुकर, शिवणयंत्र, रबर, व्हॅक्यूम क्लीनर, मोटारसायकल, टेलिव्हिजन, सेलफोन या आपल्या नेहमी वापरात असलेल्या गोष्टी, पण या गोष्टींचा शोध कोणी लावला?

60.00
Sale!

शोध समाजमनाचा

समाजवास्तव आणि तात्कालिक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे करावे लागलेले विश्लेषण या पुस्तकात मांडण्यात आले आहे. लेखिकेने अनुभवलेल्या समाजाचे दर्शन यातून झाले आहे. पुस्तकातील विषय हे त्या त्या वेळी आलेल्या विषयांवर आधारित असल्याने, त्या त्या परिसरात जाऊन प्रचलित आणि अप्रचलित स्थितींचा अभ्यास करून प्रत्येक विषय मांडण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.

180.00
Sale!

श्री गजानन महाराज : सर्वे भवन्तु सुखिन:

श्री गजानन महाराजांची महती सांगणारा आणि शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थान येथे चालणाऱ्या सेवा प्रकल्पांविषयी माहिती सांगणारा ग्रंथ. या सर्व कार्याची माहिती, त्याचे व्यवस्थापन, त्यामागची श्रध्दा आणि आपले कर्तृत्व महाराजांच्या चरणी अर्पण करणाऱ्यांचे मनोगत या ग्रंथात वाचायला मिळेल.

225.00
Sale!

श्री संत चोखामेळा व परिवार सार्थ अभंगगाथा

संपादक : डॉ. ॐ श्रीश श्रीदत्तोपासक

मूल्य : रू. ६००  

 प्रकाशनपूर्व सवलत

मूल्य : रू. ४००

श्रीरंगाच्या रंगात रंगून अवघा रंग एक करून टाकणारा हा एकमेवाद्वितीय संत परिवार. विठ्ठलभक्तीचा परमोच्च आदर्श व मूर्तिमंत करुणेचे प्रतीक संत चोखामेळा, पत्नी संत सोयराबाई, पुत्र संत कर्ममेळा,चोखोबांची बहीण संत निर्मळा व मेहुणे संत बंका या संतपंचकाचे अभंग अर्थासहित विवरण करणारा हा ग्रंथ महाराष्ट्रातील प्रत्येक घरात असावा. अशा या श्री संत चोखामेळा व परिवार सार्थ अभंगगाथा  ग्रंथाला रु. १५००/- चा पृष्ठपुरस्कार देऊन आपले श्रद्धासुमन अर्पित करण्याच्या सुसंधीचा लाभ घ्यावा! पृष्ठपुरस्कार दात्याचे ग्रंथातील सूचीत नाव प्रकाशित केले जाईल आणि या ग्रंथाची एक प्रत सप्रेम भेट दिली जाईल.

400.00
Sale!

स – संविधानाचा

स – संविधानाचा
या पुस्तकातून राज्यघटना स्वतः आपल्या निर्मितीची कथा मुलांना सांगणार आहे.
भावी पिढीतील संविधानाचे जे रक्षक आहेत, पालक आहेत म्हणजे आजची जी पिढी आहे यांच्यापर्यंत संविधान हा विषय पोहोचावा हा या मागील हेतू आहे.
5वी ते 10वीच्या मुलांनी आवर्जून वाचावे असे पुस्तक…
आपली प्रत आजच नोंदवा.

50.00
Sale!

संघ सुगंध राजाभाऊ गायधनी

संघ सुगंध राजाभाऊ गायधनी

संघ तपस्वी, संघ योगी यांच्या आठवणींचे पुस्तक.

शेवटच्या श्वासापर्यंत केवळ संघ, संघविचार, प्रचारक, श्रीगुरुजी यांच्या आठवणीतच रममाण.

आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आणि प्रेरणादायी पुस्तक.

जवळपास 170 च्या वर संघ कार्यकर्त्यांच्या नावांचा आणि आठवणींचा संग्रह असणारे पुस्तक.

संघकार्य जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.

250.00
Sale!

संघभाव

आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार आणि श्रीगुरुजी गोळवलकर या दोन विभूतींनी संघभाव कसा जगला, याचे सखोल चिंतन ज्येष्ठ विचारवंत आणि अभ्यासक रमेश पतंगे यांनी या पुस्तकातून केले आहे.

संघाच्या गाभ्याला स्पर्श करणारे, संघविचारांची खोली उलगडणारे आणि संघसूत्रांवर भाष्य करणारे पुस्तक.

मूल्य : 200/- ₹
सवलत मूल्य 160/- ₹

160.00