राष्ट्रीय विचार आणि सामाजिक भान यांना अधिष्ठान मानून विवेक पुस्तक प्रकाशन मागील अनेक वर्षांपासून विविध विषयांवरील पुस्तक व ग्रंथ प्रकाशित करत आहे. आपला गौरवशाली इतिहास, समाज, धर्म, जीवन व्यवहार इत्यादीं विषयांवरील अभ्यासपूर्ण ,संदर्भमूल्य असलेल्या पुस्तकाची निर्मिती केली आहे.
मानवी जीवनाला स्पर्श करणारे सर्व विषय आमच्यासाठी सतत उत्तम निर्मितीसाठी आवश्यक असणारे बिंदू उपलब्ध करतात, आयुर्वेद, योग, मन स्वास्थ, पर्यटन, पर्यावरण, कुटुंब व्यवस्था,आर्थिक नियोजन, उद्योग, शिक्षण, संविधान अशा विषयांचा ते राष्ट्रीय आतंरराष्ट्रीय विषयापर्यंत अनेक महत्त्वाची पुस्तके आम्ही प्रकाशित केली आहेत.
त्याचप्रमाणे राष्ट्रीय विषयावर सामाजिक भूमिका निर्माण करणारे अनेक ग्रंथ आम्ही प्रकाशित केले आहेत. जसे की वनजनगाथा, गो विज्ञान, सहकारातून समृद्धी कडे, राष्ट्रोत्थान.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमची मातृ संस्था आहे. संघ विषयक व संघ विचाराचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सातत्याने विविध विषयांवर पुस्तक व ग्रंथ आजवर प्रकाशित केले आहेत.सातत्याने प्रकाशन क्षेत्रात वैचारिक व सामाजिक प्रकाशन संस्था म्हणून आमची ओळख निर्माण झाली आहे