१ मे १९४७ रोजी साने गुरुजींनी हरिजनांच्या विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी पंढरपूरमध्ये प्राणांतिक उपोषण सुरू केले व दि. १० मे रोजी त्यांचा लढा यशस्वी होऊन उपोषणाचीही यशस्वी सांगता झाली. महात्मा गांधी, शंकराचार्य, लोकसभेचे सभापती दादासाहेब मावळणकर, सेनापती बापट, समस्त बडवे कमेटी आणि सनातनी ब्रह्मवृंद यांच्या परस्पर भिन्न भिन्न भूमिकांनी हा लढा प्रचंड गाजला.
अस्पृश्यता निर्मूलनासाठी अनेक वर्षे अनेकांचे निकराचे प्रयत्न सुरू होते. आपापल्या परीने – पद्धतीने प्रत्येक समाजसुधारक प्रयत्न करीत होता. त्याबद्दल कायदाही विचाराधीन होता. अशा वादग्रस्त संक्रमणकाळात बडवे कमेटीने गुरुजींच्या उपोषणाला मान देत, सनातनी व अन्य प्रतिगामी शक्तींचा दबाव झुगारून हरिजन मंदिर प्रवेशाचा निर्णय घेतला. बडवे कमेटीचा हा निर्णय साने गुरुजींचे प्राण वाचविणारा, त्याचबरोबर अस्पृश्यता निर्मूलन लढ्याला नवा जोम, नवा जोश देणारा ठरला.
या सत्याग्रहाच्या ऐतिहासिक घटनेवर ज्येष्ठ पत्रकार विद्याधर ताठे लिखित सा. विवेक प्रकाशित भेटवा विठ्ठला पुस्तक
सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रिया किती गुंतागुंतीच्या आणि अनेक पदरी असतात हे नव्या पिढीने समजून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
किंमत – २००/- रु.
सवलत मूल्य – १८०/- रु.
Reviews
There are no reviews yet.