Sale!

पालावरचं जिणं

पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे.

225.00 198.00

Share this product!

Book Details

Binding

Paperback

भाषा

मराठी

पृष्ठसंख्या

200

वर्ष

2021

About The Author

ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे

ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे

गिरीश प्रभुणे ‘भटके-विमुक्त विकास परिषदे’च्या माध्यमातून भटक्या-विमुक्त समाजासाठी गेली अनेक वर्षे कार्य करत आहेत. त्यांनी तुळजापूर जवळच्या यमगरवाडी वैदू, कैकाडी, पारधी इत्यादी समाजातील मुलांसाठी खूप मोठे सामाजिक कार्य केले आहे. सध्या चिंचवड येथील ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’मध्ये भटक्या समाजातल्या साडेतीनशे मुलामुलींचे शिक्षण व कौशल्यविकास यासाठी ते विशेष प्रयत्न करत आहेत. अशा प्रयत्नांमुळे या समाजात होत असलेल्या धर्मांतरणासारख्या समस्या रोखण्यासही मदत झाली आहे. गिरीश प्रभुणे यांनी आपल्या प्रभावी लिखाणातूनही भटक्या-विमुक्तांच्या अपरिचित जगाचे वास्तव सातत्याने मांडलं आहे आणि त्यामुळे त्या समाजाच्या समस्या सर्वत्र पोचण्यास मदत झाली आहे.

पालावरचं जिणं या पुस्तकातून पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी भटके-विमुक्त समाजाचे जीवन समाजापुढे आणले आहे. सांस्कृतिक धाग्याने त्यांची नाळ तुमच्या-आमच्यासारखीच भारतमातेशी जोडली गेली आहे. ते अनिकेत असले तरी भूमिपुत्र आहेत,  अकिंचन असले तरी समृद्ध सांस्कृतिक वारशाचे धनी आहेत.

भटके-विमुक्त समाजाच्या स्थितीचे यथार्थ दर्शन,  लोकविलक्षण कथा आपल्याला या पुस्तकातून वाचयला मिळतील.

मूळ किंमत : 225/-

सवलत मूल्य : 198/-

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पालावरचं जिणं”

Your email address will not be published. Required fields are marked *