संघ शताब्दीनिमित्त संघ इतिहास शब्दांकित करण्याचे काम करण्याचा मानस होता. इतिहास दोन प्रकारे सांगता येतो. पहिला प्रकार घटना, प्रसंग यांच्या माध्यमातून इतिहास सांगता येतो. दुसरा प्रकार हा व्यक्तीच्या चरित्रातून इतिहास सांगता येतो. संघकाम हे व्यक्तिकेंद्री नाही, विचारकेंद्री आहे. असे असले, तरी विचाराचा प्रसार करणार्या, विचार जगून आपल्या जीवनव्यवहारातून आदर्श उभ्या करणार्या व्यक्ती असतात हे लक्षात घेऊन ही लघुचरित्रे लिहिली आहेत. या प्रयत्नातून शंभर वर्षांचा संघ इतिहास साकार झाला आहे. कारण संघ वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी आव्हाने होती, वेगवेगळ्या समस्या होत्या. त्यातून मार्ग काढत झालेला हा शुभंकर प्रवास समजून घेण्यासाठी त्या त्या काळातील व्यक्तीचे चरित्र उपयुक्त ठरते, हे लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेतला आणि तो सुफल सफल होत आहे.
ग्रंथाची मूळ किमंत ५००/- रु.
४००/- रु. सवलतीत उपलब्ध.
नोंदणीसाठी संपर्क : ९५९४९६१८५८