पाकिस्तान : सेक्युलर राज्य ते धर्मांध राज्य

पाकिस्तानमध्ये झालेल्या घडामोडी, त्याचा आपल्यावर झालेला परिणाम आणि पाकिस्तानचे भवितव्य सांगणारे पुस्तक. पाकिस्तान कसे निर्माण झाले, ते कसे चालते, कसे चालविले जाते, अमेरिका पाकिस्तनला कसे चालविते, सौदी अरेबिया पाकिस्तान कसा चालवितो, पाकिस्तानातील मुसलमान मुसलमानाला का ठार करतात, पाकिस्तानची संस्कृती कोणती, भारतीय संस्कृती आणि पाकिस्तानची संस्कृती यात काय भेद आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.

140.00
Sale!

रक्तरंजित मध्यपूर्व : इतिहास आणि वर्तमान

इराण, इराक, सीरिया आदी देश राष्ट्र-राज्य म्हणून कधी जन्माला आले? इस्लामी राजवटीत मुसलमान मुसलमानांच्या कत्तली का करतात? दहशतवादी संघटनांचा जन्म तेथे कसा झाला? याची माहिती देणारे पुस्तक…

260.00
Sale!

राष्ट्रद्रष्टा पं. दीनदयाळ उपाध्याय (चरित्र)

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन, कार्य आणि विचार यांचा परिचय करून देणारे

135.00
Sale!

राष्ट्रद्रष्टा पं. दीनदयाळ उपाध्याय (विचार)

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन, कार्य आणि विचार यांचा परिचय करून देणारे पुस्तक. आपल्या अवघ्या 51 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी देशातल्या राजकारणात आमूलाग्र बदल घडवून आणण्याची बीजे रोवली. त्यांच्या दूरदर्शी विचाराचे दर्शन आपल्याला या पुस्तकातून होते.

135.00

लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे

अण्णा भाऊ साठे यांचे जीवनचरित्र. अण्णाभाऊंचे सर्व साहित्य समाजाचे दर्शन घडवितात. त्यांच्या साहित्यातून जिवंत माणसे साकार झालेली आहेत. त्यांनी जे पाहिले-अनुभवले, तेच आपल्या साहित्यातून साकार केले आहे.

30.00
Sale!

शंभू महादेव : श्रीक्षेत्र शिखर शिंगणापूर समग्र दर्शन

घरबसल्या शिखर शिंगणापूरचे प्रत्यक्ष दर्शन घडविण्याचे कार्य ‘शंभू महादेव’ या ग्रंथाद्वारे करण्यात आले आहे. यातील प्रकाशचित्रे अत्यंत बोलकी आहेत. कै. यशवंत बडवे यांनी महादेवाविषयी असलेली आपली श्रध्दा शब्दरूपात जपून ठेवली. हा एक संशोधनपर ग्रंथ आहे. श्री. स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठ करवीर यांच्या शुभेच्छा या ग्रंथाला मिळाल्या आहेत. संपूर्णत: रंगीत, चित्रमय, हार्ड बाऊंडं, स्पॉट लाइट, मॅट लॅमिनेशन असलेला हा ग्रंथ वाचकांना नक्कीच आवडेल.

375.00
Sale!

शोध समाजमनाचा

समाजवास्तव आणि तात्कालिक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे करावे लागलेले विश्लेषण या पुस्तकात मांडण्यात आले आहे. लेखिकेने अनुभवलेल्या समाजाचे दर्शन यातून झाले आहे. पुस्तकातील विषय हे त्या त्या वेळी आलेल्या विषयांवर आधारित असल्याने, त्या त्या परिसरात जाऊन प्रचलित आणि अप्रचलित स्थितींचा अभ्यास करून प्रत्येक विषय मांडण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.

180.00

संघर्ष महामानवाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनावर आधारित पुस्तक. व्यक्तिस्वातंत्र्य आणि व्यक्तिविकास हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय कसे बनले, हा लढा त्यांनी कसा दिला याविषयी जाणून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक. आतापर्यंत या पुस्तकाच्या चार आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.

160.00