Sale!

समिधा ग्रंथ

संघ शताब्दी वर्षाच्या पूर्वसंध्येला एकशे एक प्रचारकांच्या लघुचरित्रांचा ग्रंथ ‘समिधा’ आम्ही प्रकाशित करीत आहोत. या ग्रंथात एकशे एकच समाविष्ट का? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ शकतो. एकूणच संघाच्या प्रचारक परंपरेविषयी आम्हाला अनन्यसाधारण श्रद्धाभाव आहे. मात्र आमच्या मर्यादित क्षमता आणि सीमित कालावधी यामुळे निवडक एकशे एक प्रचारकांची लघुचरित्रे या ग्रंथात समाविष्ट केली आहेत. असे असले, तरी या एकशे एक प्रचारकांची माहिती जमा करताना काही निकष निश्चित केले होते आणि त्या निकषांच्या आधारे ग्रंथाचे विभागही केले आहेत. मर्यादित शब्दसंख्या आणि उपलब्ध माहितीच्या आधारे ही चरित्रे लिहिली गेली.

400.00

Category:
Share this product!

संघ शताब्दीनिमित्त संघ इतिहास शब्दांकित करण्याचे काम करण्याचा मानस होता. इतिहास दोन प्रकारे सांगता येतो. पहिला प्रकार घटना, प्रसंग यांच्या माध्यमातून इतिहास सांगता येतो. दुसरा प्रकार हा व्यक्तीच्या चरित्रातून इतिहास सांगता येतो. संघकाम हे व्यक्तिकेंद्री नाही, विचारकेंद्री आहे. असे असले, तरी विचाराचा प्रसार करणार्‍या, विचार जगून आपल्या जीवनव्यवहारातून आदर्श उभ्या करणार्‍या व्यक्ती असतात हे लक्षात घेऊन ही लघुचरित्रे लिहिली आहेत. या प्रयत्नातून शंभर वर्षांचा संघ इतिहास साकार झाला आहे. कारण संघ वाटचालीच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी आव्हाने होती, वेगवेगळ्या समस्या होत्या. त्यातून मार्ग काढत झालेला हा शुभंकर प्रवास समजून घेण्यासाठी त्या त्या काळातील व्यक्तीचे चरित्र उपयुक्त ठरते, हे लक्षात घेऊन हा उपक्रम हाती घेतला आणि  तो सुफल सफल होत आहे.

ग्रंथाची मूळ किमंत ५००/- रु.
४००/- रु.  सवलतीत उपलब्ध.
नोंदणीसाठी संपर्क : ९५९४९६१८५८

Binding

Paperback

भाषा

मराठी

पृष्ठसंख्या

350

वर्ष

2025