अण्णा भाऊ साठे यांचे जीवन जरी दुःख, वेदना, कष्ट, उपेक्षा, अपमान यांनी व्यापलेले असले तरी त्याचे प्रतिबिंब त्यांनी आपल्या साहित्यावर कधीच पडू दिले नाही. आपले दुःख, वेदना बाजूला ठेवून ते समाजाच्या दुःख, वेदनेशी समरस झाले आणि त्याचे निवारण होण्यासाठी आवश्यक ती कृती आणि प्रबोधन केले.
सर्व समाजगटांना त्यांनी आपले मानले. ‘माणूसपण’ हे अण्णा भाऊंच्या साहित्याचे अधिष्ठान असल्याने माणसाच्या सुख – दुःखाशी ते बांधील आहे, पण सुख-दुःखांच्या पलीकडे जाऊन सामाजिक पातळीवर, मानसिक पातळीवर समतेची, एकत्वाची भावना रुजविण्याचे कार्य अण्णा भाऊंनी आपल्या साहित्यातून केले.
सामाजिक न्यायाचा योद्धा लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे व्यक्तित्व, जीवनकार्य, त्यांचे साहित्य समजून घेण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक.
मूळ किंमत ५००/-
सवलतीच्या दारात ४००/- रुपयाला उपलब्ध.
Reviews
There are no reviews yet.